या दोन जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली, डाऊनलोड करा | Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download

nuksan-bharpai-list-download

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download: शेतकरी बांधवांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदतीचे (Ativrushti Nuksan Bharpai) वाटप झाल्यानंतर आता लाभार्थी यादी आणि मदतीचा तपशील म्हणून दोन जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या (Ativrushti Nuksan Bharpai List) संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड (Ativrushti Nuksan Bharpai List Download) कशा कराव्या? हे आज आपण या लेखात पाहणार आहोत.

Ativrushti Nuksan Bharpai List Download

मित्रांनो, राज्यात यावर्षी जुन ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. संपूर्ण राज्यात जुन महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) जाहीर केली होती. ज्याचे वाटप बर्‍याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु अजूनही बर्‍याच जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. अशातच काही जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List Download} जाहीर झाल्या आहेत. त्या तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता आणि त्यात तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता.

या दोन जिल्ह्यांच्या नुकसान भरपाई याद्या जाहीर

शासन निर्णयात “लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार काही दिवसाआधी नांदेड जिल्ह्याच्या तालुकानिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आणि आता उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्याच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. या याद्या डाऊनलोड कशा कराव्या हे तुम्ही जाणून घ्या आणि या दोन्ही जिल्ह्याच्या Ativrushti Nuksan Bharpai List Download करण्यासाठी खाली लिंक सुद्धा देण्यात आली आहे. Ativrushti Nuksan Bharpai List Download

Ativrushti Nuksan Bharpai List Download अशा करा

नांदेड जिल्हा नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी

  1. सर्वप्रथम तुम्हाला नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
    जे आहे – https://nanded.gov.in/
  2. संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “दस्तऐवज” हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  3. “दस्तऐवज” या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही पर्याय येईल, त्यापैकी “पीक नुकसानीसाठी अनुदान वितरण या पर्यायावर क्लिक करून “जुन-ऑगस्ट 2022” या पर्यायावर क्लिक करावे.
  4. “जुन-ऑगस्ट 2022” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सर्व तालुका निहाया याद्या दिसतील.
  5. तर तालुक्याच्या नावामोरील “पहा” या पीडीएफ पर्यायावर क्लिक करून आता तुम्ही त्या तालुक्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड (Ativrushti Nuksan Bharpai List Download) करू शकता.
  6. यादी डाऊनलोड झाल्यानंतर ती ओपन करून घ्यावी आणि यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे चेक करू शकता.

तर मित्रांनो, अशाचप्रकारे तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या पाहू शकता. त्यासाठी

  1. सर्वप्रथम तुम्हाला उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
    जे आहे – https://osmanabad.gov.in/mr/
  2. संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “सुचना” हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  3. सुचना या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तीन पर्याय येईल, त्यापैकी घोषणा या पर्यायावर क्लिक करावे.
  4. घोषणा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पहिलीच घोषणा तुम्हाला दिसेल, “माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)”.
  5. तर या घोषणेसामोरील “पहा” या पीडीएफ पर्यायावर क्लिक करून आता तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.
  6. यादी डाऊनलोड झाल्यानंतर ती ओपन करून घ्यावी आणि यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे चेक करू शकता.

तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या पाहू शकता.

Ativrushti Nuksan Bharpai List Download

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top