Ativrushti Nuksan Bharpai List | या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पहा

ativrushti-nuksan-bharpai-list

Ativrushti Nuksan Bharpai List : राज्यात यावर्षी खरीप हंगामात जुन ते ऑगस्ट मध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत (Ativrushti Nuksan Bharpai List) जाहीर केली होती. ज्याचे वाटप बर्‍याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

Ativrushti Nuksan Bharpai List

अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे, त्यांच्या याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List} संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. तर आता बर्‍याच जिल्ह्यात लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. Ativrushti Nuksan Bharpai List

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली

तर आता धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याची माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी (Ativrushti Nuksan Bharpai List) संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही अनुदान वाटप यादी तुमच्या मोबाईलवर कशी डाऊनलोड करता येईल, चला पाहुयात.

Ativrushti Nuksan Bharpai List Download

धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याची माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  1. सर्वप्रथम तुम्हाला उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
    जे आहे – https://osmanabad.gov.in/mr/
  2. संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “सुचना” हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  3. सुचना या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तीन पर्याय येईल, त्यापैकी घोषणा या पर्यायावर क्लिक करावे.
  4. घोषणा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पहिलीच घोषणा तुम्हाला दिसेल, “माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)”.
  5. तर या घोषणेसामोरील “पहा” या पीडीएफ पर्यायावर क्लिक करून आता तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.
  6. यादी डाऊनलोड झाल्यानंतर ती ओपन करून घ्यावी आणि यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे चेक करू शकता.

तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या पाहू शकता.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top