कोरोना पुन्हा डोकं वर काढतयं, जाणून घ्या देशातील स्थिती | Coronavirus in India

corona virus news india -

Coronavirus in India: बरेच दिवस नियंत्रणात असलेला भयावह कोरोना विषाणू (Covid-19) आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्या देशातून कोरोना विषाणूचा उगम झाला, त्या चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा अनियंत्रित झाला आहे. तेथे असंख्य लोक कोरोना रोगाने संक्रमित होत आहेत. तेथील परिस्थिती पाहून भारतातही लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

Coronavirus in India

जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला लक्षात घेत देशाला सतर्क करण्यात आले आहे. केंद्रापासून राज्यांपर्यंत सर्वत्र कोरोनाबाबत उच्चस्तरीय बैठका होऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली, तर दिल्ली, यूपी, पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, ओडिशा येथेही बैठका झाल्या. अनेक राज्यांमध्ये कोरोना केसेसच्या जीनोम सिक्वेन्सिंगला वेग आला आहे. लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तर कुठे मास्क अनिवार्य करण्यात आला आहे, तर कुठे कोरोना चाचणी वाढवली जात आहे. corona virus live news

महाराष्ट्र: प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

जगातील कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या मागील लाटेचा (Covid Wave) सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता, त्यामुळे विलंब न लावता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोविडच्या परिस्थितीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यांनी सांगितले की राज्यात एकूण 132 सक्रिय रुग्ण आहेत, त्यापैकी केवळ 22 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. राज्यात समोर आलेल्या कोरोना प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही, परंतु सर्वांनी खबरदारी घ्यावी.

मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेषत: चीनमध्ये रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे माध्यमातील बातम्यांवरून दिसत आहे.

Corona Virus New Varient

चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ-७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. सध्या चीन, जपान, अमेरिका, ब्राझील, दक्षिण कोरीया या देशांमध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा आहेत. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचसूत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

केरळमध्ये काळजी करण्यासारखे काहीही नाही, सतर्क रहा

ज्या राज्यात सर्वप्रथम कोरोना विषाणू (Corona Virus) भारतात आढळला होता, त्या केरळ सरकारने देखील कोरोनाबाबत तेथील रहिवाशांना सतर्क केले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, सध्या राज्यात काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. त्यांनी सांगितले की, राज्यातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे.

कर्नाटकात मास्क अनिवार्य

कर्नाटकने सर्व बंद ठिकाणे आणि वातानुकूलित ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी माहिती दिली की, सरकार राज्यातील इन्फ्लूएंझा सारखा आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संसर्ग (SARI) असलेल्या सर्व रुग्णांसाठी कोविड चाचणी करणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री आज घेणार महत्त्वाची बैठक

केंद्र सरकार कोरोनाचा BF.7 या नवीन प्रकार आणि देशातील या विषाणूच्या वाढत्या प्रकरणांवर आता लक्ष ठेऊन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज दि. 23 डिसेंबर 2022 रोजी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

वेगवेगळ्या देशांमध्ये कोविड प्रकरणांची अचानक वाढ होत असताना, इंडियन मेडिकल असोसिएशन सतर्कतेने आणि जनतेला तात्काळ प्रभावाने कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने नेमके कोणते नियम पाळण्यास सांगितले आहे, हे तुम्ही खालील ट्वीट मध्ये पाहू शकता.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top