Cibil Score Tips in Marathi :-दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला आर्थिक अडचणी येतात अशावेळी सर्वात आवश्यक व महत्त्वाची बाब म्हणजे आपला Cibil Score होय. कारण आपला सिबिल स्कोर जर चांगला असेल, तर अशावेळी आपल्याला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
Good Cibil Score for Loan Sanction
या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, Cibil Score कसा चांगला ठेवावा ? किंवा सिबिल स्कोर खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी ? सिबिल स्कोर चांगला असेल तर आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम अन्यथा आर्थिक अडचणीमध्ये इतरांकडे हात पसरण्याची वेळ आपल्याला नक्कीच येऊ शकते.
📢 हे सुध्दा वाचा : LIC ची व्हाट्सअँप सेवा सुरु; पहा संपूर्ण माहिती
तुम्हांला माहीतच असेल, कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका किंवा वित्तीय संस्था सर्वप्रथम आपला सिबिल स्कोर तपासून पाहतात, त्यानंतरच कर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण करतात. स्कोर कमी असेल, तर परिणामी तुम्हांला लोनसुध्दा भेटत नाही. त्यामुळे सतत आपला CIbil Score कसा चांगलं ठेवावा, याकडे नक्की लक्ष्य असावे.
Good Cibil Score is Required for Quick Loan Approval
तरी या ठिकाणी आपण पाहूयात की, सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी काय महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवावेत. सिबिल स्कोर सामान्यता 300 ते 900 च्या आतील आकडा असतो. सिबिल स्कोर म्हणजे जणू आपली आर्थिक कुंडली किंवा आर्थिक इतिहास होय.
सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा
वेळेत EMI भरा : जर तुम्ही एखादा बँकेतून किंवा संस्थेकडून कर्ज घेतलेलं असेल व हप्ता तत्वावर त्याची परतफेड करत असाल तर ते हप्ते किंवा त्या कर्जाचा ईएमआय (EMI) वेळेवर भरा.
Credit Card वापरतांना काळजी घ्या : तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल व तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर, दरमहा क्रेडिट कार्डचा तयार होणारा बिल वेळेवर भरत चला; कारण यामुळे सुद्धा तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच बँकेकडून देण्यात आलेल्या लिमिटपेक्षा जास्त लिमिटचा वापर शक्यतो टाळा.
आवश्यक तितकंच कर्ज घ्या : तुम्हाला आवश्यक असेल तितकच कर्ज घ्या अन्यथा; घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजाची परतफेड करणे तुम्हाला खूपच अवघड होऊन जाईल. तसेच कर्ज वाढल्यास परिणामी EMI वेळेवर भरला जात नाही, त्यामुळे आपल्या सिबिलं स्कोरवर परिणाम होतो.
Cibil Score वारंवार पाहू नका : सिबिल स्कोर मोबाईलवर पाहण्याची सुविधा सध्या सुरु झालेली असल्यामुळे बहुतांश यूझर सतत आपला cibil score किती आहे तपासण्याचा प्रयत्न करतात; पण वारंवार सिबिल स्कोर चेक केल्यानेसुध्दा तुमचा आर्थिक तपशील घसरू शकतो याची सुध्दा दक्षता घ्या.
एकत्रित Loan खाते काढणे टाळा : एकत्रित खाते म्हणजेच ज्याला आपण जॉईंट अकाउंट किंवा सामायिक खाते म्हणतो. असे खाते काढत असताना काळजी घ्या की तुमचा सहकारी पूर्णतः EMI रक्कम भरण्यास सक्षम आहे का ? कारण सहकार्याने रक्कम नाही भरल्यास तुमचा सुध्दा Cibil Score खराब होऊ शकतो. त्याचप्रमाणे एखाद्याचा Loan Guarantor होतांना सुध्दा काळजी घ्या; कारण थकीत कर्जाच्या Gurantor चा सुध्दा सिबिल खराब होतो.
निष्कर्ष : मित्रांनो, वरील नमूद सर्व अटी तुम्ही काळजीपूर्वक योग्यरित्या हाताळल्यास सिबिल स्कोरच्या संदर्भात तुम्हाला नक्कीच भविष्यकाळात कुठेही कर्ज घेताना अडचण येणार नाही.