Jilha Parishad ZP Bharti 2022 Maharashtra – जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 सवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र. 1 येथील दि.21.10.2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.
Jilha Parishad ZP Bharti 2022 Maharashtra
5 संवर्ग वगळून जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) संदर्भ क्र. 2 येथील दि.15.11.2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे.
“सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासबधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.”, असे नमूद करण्यात आलेले होते.
जिल्हा परिषद भरती सुरू होणार 16000 पेक्षा जास्त जागा, GR आला जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्याऐवजी सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Programme Based test/Examination) घेण्यात येईल. व त्यासाठी टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) यापैकी कोणत्याही एका कंपनींची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषदेची असेल, असे वाचावे.
नवीन GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा