Land Record Online Maharashtra : मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नकाशा खूपच महत्त्वाची भूमिका बजावतो. मग तो नकाशा प्रवासादरम्यान वापरत असलेला असेल किंवा आपल्या शेतीचा, घराचा किंवा प्लॉट जमिनीचा नकाशा असेल.
Land Record Online Maharashtra
शासनामार्फत शेतकरी व सामान्य वर्गांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता घरबसल्या आपल्या घरचा, प्लॉटचा किंवा शेतीचा नकाशा आपल्या मोबाईलवरती डाऊनलोड करण्याची किंवा पाहण्याची सुविधा नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे.
या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, सहजरीत्या फक्त ५ मिनिटांमध्ये आपण आपल्या मोबाईलवर घराचा, शेतीचा किंवा प्लॉटचा नकाशा कशाप्रकारे पाहू शकतो.
ऑनलाईन नकाशा कसा बघावा ?
सर्वप्रथम तुम्हाला नकाशा मोबाईलवरती पाहण्यासाठी भूनकाशा.कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे, वेबसाईटवरती आल्यानंतर खालीलप्रमाणे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल.

- ज्यामध्ये सर्वप्रथम राज्य असेल त्यानंतर Rural-Urban असे दोन पर्याय असतील, तुम्ही जर खेड्यागावातील असाल तर Rural हा पर्याय निवडा अन्यथा Urban हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका निवडा Village लिस्टमधून तुमचे गाव सिलेक्ट करा.
- त्यानंतर Search By Plot No या रखाण्यामध्ये तुमच्या शेतजमिनीचा प्लॉट नंबर, सर्वे क्रमांक टाकून सर्च या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर नकाशामध्ये तुम्ही टाकलेला क्रमांक निळ्या रंगाने हायलाईट केला जाईल.
- आता सर्वात शेवटी मॅप रिपोर्ट (Map Report) हा एक पर्याय तुम्हाला दिसत असेल, त्या पर्यावरण क्लिक करा.
- एक नवीन पेज ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्ही Show Report in PDF या पर्यावरण क्लिक करून, तुमच्या जमिनीचा नकाशा पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकता.
- डाउनलोड केलेल्या पीडीएफ नकाशामध्ये तुम्ही टाकलेला गट क्रमांक किंवा त्या प्लॉट क्रमांकमधील सर्व जमीन मालकांची नावे, खाते क्रमांक, सर्वे क्रमांक व एकूण क्षेत्रासह सर्व माहिती दाखविली जाईल.
🟠 निष्कर्ष : अशाप्रकारे मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये न जाता, तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटांमध्ये शेतजमीन, प्लॉट इत्यादीचा नकाशा पाहू शकता.
घरबसल्या नकाशा पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा ⤵