नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2022, शेळी मेंढी गट वाटप, गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु : Navinya Purna Yojana; ah mahabms com online application Registration

Navinya Purna Yojana

Navinya Purna Yojana : पशुपालक व शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना शासनामार्फत राबविल्या जातात त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी अशी योजना म्हणजे नावीन्यपूर्ण योजना. नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2022, शेळी मेंढी गट वाटप, गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु

नाविन्यपूर्ण योजना (Navinya Purna Yojana)

नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर शेळी, मेंढी गटवाटप त्याचप्रमाणे गाय म्हैस या पशु खरेदीसाठी अनुदान दिलं जातं.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा ? अर्जासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागतील ? अनुदान किती असेल; इत्यादी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत राहील. योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.

AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे. आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे.

अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत.केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं

  • बँक पासबुक
  • आधारकार्ड
  • रहिवाशी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
  • शैक्षिणक कागदपत्र
  • शासकीय सेवेत रुजू नसल्याबाबत प्रमाणपत्र
  • ३ रे आपत्य नसल्याबाबत प्रमाणपत्र
  • महिला बचतगट प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला

नाविन्यपूर्ण योजना प्रकार

नाविन्य पूर्व योजना सामान्यता दोन प्रकारांमध्ये किंवा दोन गटांमध्ये मोडली जाते, यामध्ये पहिला गट म्हणजे राज्यस्तरीय नाविन्य पूर्व योजना व दुसरा गट म्हणजे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना.

ज्यामध्ये गाय, मेंढीपालन, शेळीपालन यासाठी राज्यस्तरीय योजना राबविली जाते; तर जिल्हास्तरीय योजनेमध्ये इतर 23 योजना किंवा उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सन २०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.

 

संपूर्ण योजनेचा तपशील खालीलप्रमाणे

 

mahabms01 -
mahabms02 -
  • राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
  • राज्यस्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
  • राज्यस्तरीय योजना – 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
  • जिल्हास्तरीय योजना – शेळी / मेंढी गट वाटप करणे
  • जिल्हास्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
  • जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे
  • जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे

सुचना : वरील नमूद योजनाअंतर्गत विविध योजना देण्यात आलेल्या आहेत, अर्जदारांनी त्यांचा गरजेनुसार त्या-त्या योजनेसाठी अधिक माहिती पहा.. या पर्यायावर क्लिक करून अधिक माहिती पाहावी व त्यानंतरच अर्ज करावा. तसेच इतर अधिक माहिती अनुदान, कागदपत्रं, शासन निर्णय इत्यादीसाठी खालील योजना लिंकवर क्लिक करा.

https://ah.mahabms.com/webui/yojana-details

नाविन्यपूर्ण योजना अनुदान किती ?

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जर लाभार्थी अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीतील असेल, तर अश्या अर्जदारांना 75 टक्के अनुदान दिलं जातं, तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थी अर्जदारांना 50 टक्के अनुदान दिलं जात.

अर्ज करण्याची मुदत

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेतकरी व पशुपालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी शेवटची दिनांक किंवा मुदत 11 जानेवारी 2023 देण्यात आलेली असून त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही, याची अर्जदारांनी दक्षता घ्यावी.

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

इच्छुक व पात्र अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट म्हणजेच ah.mahabms.com यावरती आपला अर्ज विहित मुदतीत व सर्व योग्य माहितीसह अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी अर्जदार जवळील सीएससी सेंटर, महा-ई-सेवा केंद्र चालक यांची मदत घेऊ शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top