पोलिस भरती या तारखेपासून मैदानी चाचणी होणार | police bharti maharashtra ground date 2022

police bharti maharashtra ground date

police bharti maharashtra ground date 2022 – महाराष्ट्रातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या 18,331 जागांसाठी तब्बल 18 लाख 27 हजार अर्ज आले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर मोबाईलवर पाठविले जाईल. 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.

police bharti maharashtra ground date 2022

पहिल्यांदा चालक पदासाठी मैदानी होईल, त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. रोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन 22 डिसेंबरपर्यंत पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे.

अशी होणार चाचणी

उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरलेल्या उमेदवारांना कुठे परीक्षा द्यायची हे ठरवावे लागेल. कोणालाही दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही.

मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी चाचणी घेतली जणार आहे. उमेदवारांनी जेथे मैदानी चाचणी दिली असेल, तेथेच लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे.

सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. त्यातून एका जागेसाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी व लेखी परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असेल, शिवाय व्हिडिओ शुटिंगही केले जाणार आहे.

जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे.

मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु, उमेदवाराने या शहरात जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याच ठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील वी लागणार आहे.

गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन् व्हिडिओ’चा वॉच

मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांचा मेरिटनुसार लेखी परीसाठी निवड होईल मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत कार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही मेल्यांचा वॉच राहणार आहे.

तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सिद्धेश्वर यात्रेदिवशी चार दिवस सुटी

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेनिमित्त 12 से जानेवारी या चार दिवसात मैदानी चाचणी होणार नाही. त्या दिवशी उमेदवारांना सुटी राहील. दरम्यान 2 ते 11 जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे. पण उमेदवार शिल्लक राहिल्यास त्याची सुटीनंतर मैदानी घेतली जाणार आहे. पण प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पथसंचालनाची तयारी करावी लागेल. त्यामुळे 26 जानेवारीनंतर त्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यासंदर्भात 22 डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top