Vanrakshak Bharti Maharashtra – भरतीसाठी नियोजित कालबद्ध, पेसा क्षेत्रातील पदभरतीची अधिसूचना स्वतंत्र पूर्वी पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची 100 टक्के पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव होती. त्यानंतर 29 ऑगस्ट 2019 रोजी राज्यपालांच्या आदेशान्वये पेसा क्षेत्रातील पदे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार 100 टक्के, 50 टक्के आणि 25 टक्के याप्रमाणे राखीव करण्यात आली आहे.
Vanrakshak Bharti Maharashtra
त्यामुळे नेमकी कुठल्या आदेशान्वये भरती करायवायची याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. ते प्राप्त होताच पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी सूचना नव्याने स्वतंत्ररित्या निर्गमित केल्या जाणार आहेत. बिगर पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीसाठी नियोजित कालबद्ध कार्यक्रम जाहीर असून त्यानुसार ती पदे भरली जातील.
- जाहीरात प्रसिद्धी : 20 डिसेंबर 2022
- अर्ज स्वीकारणे : 31 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन परीक्षा घेणे : 10 जानेवारी ते 20 जानेवारी 2023
- ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे : 30 जानेवारी 2023
- शारीरिक चाचणी व्यावसायिक 1 चाचणी (आवश्यक असल्यास) : 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023
- अंतिम निवड सूची जाहीर करणे : 5 मार्च 2023 पर्यंत
- खासगी कंपनीद्वारे परीक्षा, पारदर्शीपणे ” भरती करण्यासाठी प्रयत्न.
- वेतनश्रेणी – सहाव्या वेतन आोगानुसार – 5200 रुपये 20200 ग्रेड पे – रुपये 1800
- शासनाने पदांची माहिती एमपीएससीला सादर केल्याने वनरक्षकांची भरती केली जाणार आहे.
पदसंख्या वनवृत्तनिहाय
वनवृत्त मंजूर पदे
नाशिक 630
गडचिरोली 979
अमरावती 965
यवतमाळ 661
औरंगाबाद 747
धुळे 738
पुणे 395
ठाणे 1510
कोल्हापूर 754
एकूण – 9640
पात्र उमेदवारांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा, एकूण चार विषयांचा असेल समावेश
पात्र उमेदवारांची 120 गुणांची लेखी परीक्षा होईल. 90 मिनिटांचा कालावधी राहील. 4 विषयांचा समावेश असेल. माध्यमिक अर्थात दहावीच्या पातळीची राहील. उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण हवा. त्यामध्ये सामान्यज्ञान (गुण :30 सामान्यज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, – वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन) बौद्धिक चाचणी 30 गुणांची तर मराठी 30 तर इंग्रजी 30 ची होईल. यासाठीची माहिती इच्छुकांना देण्यात आली आहे.