वनरक्षक भरती सुरू होणार नवीन वेळापत्रक जाहीर : vanrakshak bharti 2022 new time table declared

Vanrakshak Bharti

Vanrakshak Bharti 2022 : नमस्कार मित्रांनो, वनरक्षक विभागाच्या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकाची तुम्ही वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक विभागाकडून सविस्तर आणि संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला असून त्याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Vanrakshak Bharti Maharashtra 2022

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट- ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात १५ जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, १ ते २० फेब्रुवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे 26 डिसेंबर 2022
भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे 31 डिसेंबर 2022
जाहिरात प्रसिध्द करणे  15 जानेवारी 2023
अर्ज स्वीकारणे  31जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा घेणे 01 ते 20 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे 25 फेब्रुवारी 2023
आवश्यक पदांसाठी चाचणी 15 एप्रिलपर्येंत
नियुक्ती आदेश निर्गमित करणे 30 एप्रिल 2023 पर्येंत

वन विभागातील पदभरतीसाठी २० डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून १० ते २० जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर ३० जानेवारीला निकाल जाहीर करून ५ मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

वनरक्षक भरती वेळापत्रक

अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता विश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे.

सध्याची परिस्थिती विचारात घेता २० डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मित्रांनो, अश्याप्रकारे वनरक्षक भरतीसाठीचा संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेला असून लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज सुरु झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र इत्यादीबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील येणाऱ्या लेखामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे आमचा व्हाट्सअँप ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top