एल आय सी ची व्हॉट्सॲप सेवा सुरू : WhatsApp Service Of LIC Started

WhatsApp Service Of LIC Started

WhatsApp Service Of LIC Started – एलआयसीची व्हॉट्सॲप सेवा, नवी दिल्ली एलआयसीने (भारतीय जीवन विमा) आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. याबाबतवी माहिती एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी माहिती दिली.

WhatsApp Service Of LIC Started

या सेवेच्या माध्यमातून एलआयसीच्या पॉलिसीधारकांना काही विशेष सेवा उपलब्ध करून दिली आहे. ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसीच्या पोर्टलवर आपली पॉलिसी रजिस्टर केली आहे, त्यांनी 8976862090 या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सॲप हाय लिहून घरबसल्या एलआयसी संबंधित माहिती मिळणार आहे.

ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसीच्या पोर्टलवर धोरणानुसार रजिस्ट्रेशन केले आहे, ते ही सेवा मिळण्यास पात्र आहेत. एलआयसी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सेवांच्या रजिस्ट्रेशनसाठी पॉलिसीधारकाला एलआयसीच्या साईटवर जाऊन पॉलिसी नंबर आणि आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन आणि व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून एलआयसच्या सर्व विम्याबाबत माहिती मिळणार आहे, अशी माहिती एम. आर. कुमार यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top