मोठी बातमी ! कोणालाही कॉल केल्यावर आधार फोटोसोबत तुमचे नाव सुद्धा दिसणार : When you call someone, your name will also appear along with the Aadhaar photo

When you call someone, your name will also appear along with the Aadhaar photo

When you call someone, your name will also appear along with the Aadhaar photo government update – भरपूर वेळा काय होतं आपल्याला कुणाचा कॉल आलेला कळत नाही. कुणीही आपली फसवणूक करू शकतो त्यामुळेच सरकारने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जसं आपण ट्रू कॉलर ॲप वापरतो तशा पद्धतीने एक नवीन ॲप हे आपलं गव्हर्मेंट काढणार आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला कोणताही कॉल जरी आला तर तुम्हाला त्या व्यक्तीचं आधार कार्ड वरती जे नाव आहे ते नाव आणि फोटो हे तुम्हाला आता तुमच्या मोबाईल वरती दिसणार आहे.

फोटोसह आता दिसेल मोबाइल नंबर. ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नियम आणण्याची तयारी चालविली आहे.

त्यानुसार मोबाइल कॉलर आयडीमध्येच बदल करण्यात येत असून, त्यामुळे बनावट नंबर गायब होतील. सध्याच्या कॉलर आयडी पद्धतीत बदल होणार असल्याचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सूतोवाच केले होते.

केवायसी प्रणाली करणार लागू

ट्रायसोबत एक नवीन प्रणाली तयार करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीत कॉल करणाऱ्यांचा मोबाइल नंबरसह त्याचा फोटोही दिसेल. त्यासाठी सरकार केवायसी प्रणाली लागू करणार आहे. यात दोन व्यवस्था लागू राहतील. एक म्हणजे आधार कार्ड आधारित आणि दुसरी सिम कार्ड आधारित.

मोबाइल क्रमांक आधारशी लिंक

आधार कार्ड आधारित नवीन प्रणालीनुसार सर्व मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक केले जातील. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने कॉल करताच, मोबाइल क्रमांकासह त्याचे नावदेखील दिसेल. आधार कार्डमध्ये जे नाव असेल तेच नाव यात दिसेल.

टू-कॉलरपेक्षा वेगळी यंत्रणा

टू-कॉलर किंवा इतर कॉलर आयडी अॅपमध्ये नाव दिसण्याची व्यवस्था असली तरी यूजरने स्वतः टाकलेले नाव त्यात दिसते. यूजरने चुकीचे नाव टाकल्यास तेच टू कॉलर दाखविते. सरकारच्या नवीन प्रणालीत हा दोष असणार नाही. आधारवरील नावच दिसेल.

सिम कार्ड आधारित यंत्रणा

सिम कार्ड आधारित प्रणालीत, नवीन सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकास फोटो आणि ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे द्यावी लागतील. त्याआधारे कॉलिंगसोबत लोकांचे फोटो जोडले जातील, त्यामुळे बनावट कॉल कोणी केला, हे ओळखणे सोपे होईल. याचाच अर्थ ग्राहकाने सीम कार्ड खरेदी करताना जो फोटो कंपनीला सादर केला असेल, तो त्याने केलेल्या कॉलसोबत दिसून येईल.

असा होईल फायदा

सूत्रांनी सांगितले की, नवी ओळख प्रणाली कार्यान्वित होताच, अनोळखी नंबरवरून आलेला कॉलही कोणाचा आहे, हे कळेल. कॉल कोण करतंय, हे स्वीकारणायास फोटोसह कळेल. कॉल करणारा व्यक्ती आपली वैयक्तिक ओळख लपवू शकणार नाही. त्यामुळे फसवणुकीला आळा बसू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top